| म्या हिले म्हटल भूक लागलीव मले, खायले देन काही मंगापसून चिपकली टीवीले , तुय मन भरलच नाही? थ्या म्हटल, पयले कसोटी पायतो, मांग घर घर की कहानी, अन घंट्यापासन मी उपाशीं.. त तुह्या जिवाच नाई पानी? तवा अशी खवललि माह्यावर, म्हणे प्रेरनाची फारकती झाली तिले एकच लेकरु व्हत व माय, त्याले दाबल व मातीच्या खाली सारे पांढरया कपड्यात रडून राह्याले....माय आसवान भरली पायली अथी माह्या जीवाची मासोयी झाली.....तुम्हाले भूक लागुन रायली?? थांबा जरासेकथ्या पर्वतिले दवाखान्यातून येऊ देते थे श्रुति गावाहून आली का वांगे चिराले घेते थे तुलसी जेलातुन आली हाये....तिच काय व्हते ते पाहू दया सा महिन्यातून बाद नंदिनी होशात आली.. तिले जरास खाऊ दया भाऊ आखरी १२ ले सोडला टीवी तिन, मी ता गेल्तो निजुन मुट्ठीभर चनेच खाल्ले जे ठिवले होते भिजुन राती येकले उठवल हिन्... म्हने झोपता कायले आता उकडपेंडी केली दह्याची साजरी....माह्यासंग खाता? रागच आला मले, म्हटल.....फाल्तुच्या सिरिअली पाह्यत थ्या भिन्गरिवानी फ़िरवत तुले.....तूबी फिरत राह्यत उद्या उपाशी मेलो म्हंजे...थ्या तुयसीवानीच गया काढजो मंग साजरा सयंपाक करूनसन्या, मह्या फोटोले वाढजो!!! |
Popular Posts
-
तुझ्या रुपात मन कैद माझे झाले . तो कविता वाचत होता . " गप रे " ति वैतगली होति . जरा सिरीयस बन . २ वर्षे झालीत .....
-
गंध आवडला फुलाचा म्हणून फूल मागायचं नसतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.... परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात...
-
मित्रांनो ही स्टोरी मी एका blog वर वाचली आहे... just share करतोय... enjoy.. ! १० मिनिटे वेळ काढून वाचा.. tension free व्हाल... :) ::::‘प...
-
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे..... तिला म्हणालो,मला आजकाल झोप येत नाही काय करु, तुझी आठवण मला झोपूच देत नाही क्षणभर विलम्ब न करता तिन...
-
मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे ! मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे ! खरखरत्या उन्ह्यात,घामांच्या धारात सायकलची चाके ओढताना मी ...
-
म्या हिले म्हटल भूक लागलीव मले, खायले देन काही मंगापसून चिपकली टीवीले , तुय मन भरलच नाही? थ्या म्हटल, पयले कसोटी पायतो, मांग घर घर की ...
-
खुप विचार केला, पण Answer काही सापडेना |... खुप विचार केला, पण Answer काही सापडेना | तुझ्या कडुन येणा-या Miss Call च गुपित काही उघडे...
Thursday, December 30, 2010
म्या हिले म्हटल भूक लागलीव
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment