Popular Posts

Thursday, December 30, 2010

खुप विचार केला, पण Answer काही सापडेना |...

खुप विचार केला, पण Answer काही सापडेना |...
खुप विचार केला, पण
Answer काही सापडेना |
तुझ्या कडुन येणा-या
Miss Call च गुपित काही उघडेना ||
काम तुझं असुन ही,
Miss Call मला करतेस |
माझा फोन जो वर येइना,
Call वर Call करतेस ||

म्हणुनच मला Question पडलाय,
तु नेहमीच Miss Call का करतेस? |
Monthly मिळणा-या Talk Time च
Actually तु काय करतेस? ||
असं ही मला समजलंय,
तु सर्वांनाच Miss Call मारतेस |
कीतीही Urgent असलं तरी ही,
पैशाची बचत करतेस ||

असं ही नाही की,
तु खुप Poor आहेस
आणि Economically संकटात आहेस ||
म्हणुनच कधीतरी
Call ही करत जा ||
एवढे रुपये देऊन Mobile विकत घेतला,
त्याचा पुरेपुर Benefit घेत जा ||
Eagerly मैत्रीसाठी, प्रेमापोटी मी ही,
तुझ्या Miss Call ला Reply देतो |

Now आता असं होणार नाही,
Just एवढंच तुला सांगतो ||
तु समजदार आहेस,
या पुढे Call करशील |
Talk Time कडे न बघता,
माणुसकीला जपशील || 

म्या हिले म्हटल भूक लागलीव

म्या हिले म्हटल भूक लागलीव मले, खायले देन काही
मंगापसून चिपकली टीवीले , तुय मन भरलच नाही?
थ्या म्हटल, पयले कसोटी पायतो, मांग घर घर की कहानी,
अन घंट्यापासन मी उपाशीं.. त तुह्या जिवाच नाई पानी?
तवा अशी खवललि माह्यावर, म्हणे प्रेरनाची फारकती झाली
तिले एकच लेकरु व्हत व माय, त्याले दाबल व मातीच्या खाली
सारे पांढरया कपड्यात रडून राह्याले....माय आसवान भरली पायली
अथी माह्या जीवाची मासोयी झाली.....तुम्हाले भूक लागुन रायली??
थांबा जरासेकथ्या पर्वतिले दवाखान्यातून येऊ देते
थे श्रुति गावाहून आली का वांगे चिराले घेते
थे तुलसी जेलातुन आली हाये....तिच काय व्हते ते पाहू दया
सा महिन्यातून बाद नंदिनी होशात आली.. तिले जरास खाऊ दया
भाऊ आखरी १२ ले सोडला टीवी तिन, मी ता गेल्तो निजुन
मुट्ठीभर चनेच खाल्ले जे ठिवले होते भिजुन
राती येकले उठवल हिन्... म्हने झोपता कायले आता
उकडपेंडी केली दह्याची साजरी....माह्यासंग खाता?
रागच आला मले, म्हटल.....फाल्तुच्या सिरिअली पाह्यत
थ्या भिन्गरिवानी फ़िरवत तुले.....तूबी फिरत राह्यत
उद्या उपाशी मेलो म्हंजे...थ्या तुयसीवानीच गया काढजो
मंग साजरा सयंपाक करूनसन्या, मह्या फोटोले वाढजो!!! 

मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे !

मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे !

मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे !

खरखरत्या उन्ह्यात,घामांच्या धारात
सायकलची चाके ओढताना मी पाहिले आहे ||1||

ढगांच्या गडगडाटात,विजांच्या कडकडाटात
पथ्यरापरी अचल राहताना मी पाहिले आहे ||2||

कापरत्या थंडीत,गोरठलेल्या हातात
आईला सदेव साथ देताना मी पाहिले आहे ||3||

कर्जाच्या बोज्यात,आजराच्या विळख्यात
सदेव हसताना मी पाहिले आहे ||4||

पैश्याच्या कडकीत,सणासुदीच्या दिवशी
आईला शालू आणण्याची तगमग मी पाहिली आहे ||5||

फणफणत्या तापात कुड्कुडत्या सार्दित
सुर्याउन्हि कणखर आणि चंद्रउनही शीतल होताना मी पाहिले आहे ||6||

नाउमेदीच्या काळात,स्पर्ध्येच्या युगात
उंच उडण्यासाठी पंख देताना मी पाहिले आहे ||7||

कष्टाने कमवलेल्या पैश्यात,2BHK च्या दुनियेत
स्वप्नाउनही सुंदर असे घरकुल उभे करताना मी पाहिले आहे ||8||

आमच्या शिक्षणात,आईच्या आनंदात
गेली अडीच दशके राबताना मी पाहिले आहे ||9||

मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे !

Wednesday, December 29, 2010

अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे

अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.....

तिला म्हणालो,मला आजकाल झोप येत नाही
काय करु, तुझी आठवण मला झोपूच देत नाही
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स उघडली
झोपेची गोळी काढून,माझ्या हातावरती दिली.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो, माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे.
रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या प्रेमाचा रंग आहे.
ती म्हणाली,धीर धर अजुन थोडासाच उशीर आहे.
उद्या आमच्या रुग्नालयात मोफ़त रक्ततपासणी शिबीर आहे.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो, तुझ्यासाठी काहीही करु शकतो.
माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो.
त्याक्षणी ती उठली,आणि आत निघून गेली.
माघारी येताना हाती"डिसेक्शन बोक्स"घेवून आली.
..... मित्रांनो अशी ही, माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली.
तिने तिची ओढणी,माझ्या पायावरती बांधली.
नजरेस नजर मिळवून माझ्या,हळूच ती म्हणाली.
पडलास तू,पण जखम माझ्या काळजावरती झाली.
.......... तर माझी ही केस अशी आहे.
एक एम.बी.बी.एस. माझी प्रेयसी आहे.