Popular Posts

Friday, June 24, 2011

‘प्यार का पंचनामा’

मित्रांनो ही स्टोरी मी एका blog वर वाचली आहे... just share करतोय... enjoy.. ! १० मिनिटे वेळ काढून वाचा.. tension free व्हाल... :)


::::‘प्यार का पंचनामा’ ::::


पहिला मित्र -”ती आली होती सकाळी.”
………………….
दुसरा मित्र -”काय बोलली ती?”
पहिला मित्र -……”हेच तू कि तू बोलत नाही आहेस म्हणून…..काय?…काय प्रोब्लेम काय आहे? “
दुसरा मित्र -”प्रोब्लेम?? ……………अबे प्रोब्लेम हा आहे कि ती पोरगी आहेअजून काय प्रोब्लेम आहे बे??
“प्रोब्लेम हा आहे कि मला वाटतं माझ्या आयुष्यात कुठलाच प्रोब्लेम नसायला पाहिजे ….आणि….. माझ्या आयुष्यात काही प्रोब्लेम नसेल तर हा तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रोब्लेम आहे”
“आणि……. खड्यात तिला काळजी आहे रे…!”
“तिने तर आनंद साजरा करायला पाहिजे …कारण हेच तर तिला पाहिजे आहे ………अरे तुला सांगतो आज काल तर मनात येतं कि तिने तोंड उघडलं कि तिच्या तोंडातच काही तरी टाकून द्यावं!! …मागच्या सहा महिन्यात सगळं बघितलं आहे मी…अबे कोणतं प्रेम? ………कोणतं नात??कसलं सुख?? … रिलेशन चा अर्थच हा असतो कि end to ur own happiness !!…त्याच्या नंतर, all u have to worry abt is, ……तिच्या आवडी! …….तिचा वाढदिवस! ….तिच्या कुत्र्याचा वाढदिवस!!  … तिचा new year जो कधी तुमचाही new year असायचा!”
“………ह्या पोरींना ना….. कुणीच खुश नाही ठेवू शकत……..सुखी बाई हि दंत कथा आहे बे a happy woman is a myth !!!… तू batman वालीलाच बघून घे! ….
‘तू स्वतः तर काही करू शकत नाहीस… काहीच कामाचा नाहीयेस…. good for nothin आहेस मी तुझ्या सारख्या माणसासोबत कशी राहू शकते?!!’….
आणि ज्या दिवशी तो बिचारा batman बनला … मग लगेच …
‘अरे तू तर batman बनलास… मला तर एक साधा नॉर्मल माणूस पाहिजे होता, मी तुझ्या सोबत कशी राहू शकते?!!’ …”
“… सगळा साला ह्या कथेंचा दोष आहे … होपलेस बॉलीवूड रोम्यांटिक मसाला !.. एक पोरगा एक पोरगी दोघं प्रेमात पडले, दोघं एकत्र झाले! फिल्म संपली!! .. पण साला ह्याच्या नंतरची कहाणी कुणीच सांगत नाही ……ह्याच्या नंतरची कहाणी मी सांगतो!…………….ह्याच्या नंतर पोराने पोरीला दोन दिवस मिठी नाही मारली तर प्रोब्लेम .. मिठी मारली तर ‘चीप होत आहे ……इतकं पण चांगला नाही वाटत’ … ………..
……..अबे शोप्पिंग संपत नाही ह्यांची!! … बघ पहिले कुशन्स आले, मग करटंस आले … मग करटंसला म्याच नाही झाले म्हणून अजून कुशन्स आले!! …… साला इतकी कप आहेत माझ्या घरी कि विकायला काढलीत न तर महिन्याचा खर्च निघेल माझा!!!”
“………… एक तर जी गोष्ट विकत घ्यायला जाईल ती घेणार नाहीत … दोन आठवडे डोकं खाईल
‘टेबल घ्यायचा आहे. टेबल घ्यायचा आहे’
… मग ५ तास मॉल मध्ये घालवून एक सडकी चप्पल घेऊन येईल आणि मग परत दोन आठवडे डोकं खाईल…
‘टेबल घ्यायचा आहे. टेबल घ्यायचा आहे’
“. … ऑफिस मध्ये काम करत आहे .. फोन येऊन जाईल! .. फोन उचल्या उचलल्याच सांगून टाकत असतो कि बोलू नाही शकत .. आता एव्हढी का कठीण गोष्ट आहे हि गोष्ट समजायला?? …
‘दोन मिनिट बोलशील तर काय होऊन जाईल….’
….. अरे दोन मिनिट बोलून घेईल तर तुला काय भेटून जाईल माझी आई? धडाने तर बोलू शकणार नाही .. अन त्याच्या नंतर i love u बोलल्याशिवाय फोन काटला … तर नाटक!    …….. सर्वात जास्त दिमागचा दही तर ह्या मोबिल फोन ने केला आहे ! सर्वात फालतू इंवेन्षण आहे साला! …एक conspiracy चा पट्टा आहे गळ्यातला साला… वरून ह्यांच्या जाहिराती पण पहा ….‘घ्या सर एक पैसा पर सेकंद! …अजून फोन करा …जास्त वेळ बोला :) .. अरे कॉल स्वस्त झाल्याने गोष्टी थोडी मोठ्या होऊन जातात बोलण्यासाठी ! …..मग ह्याचं उत्तर त्यांना पण द्या … ‘कि तुझ्याकडे काहीच कसं नाही बोलायला?.. तुला आता इन्टरेस्ट नाही राहिला माझ्यात’ .. ‘तुला हम्म हम्म च म्हणता येत तर मी तुला कॉलच कशाला केला ?’ …अरे माझी आई…..! ...मला काय माहित तू मला फोन कशाला केला! …..जाऊन भारती मित्तल ला विचार ना !!!!…तुला मी सांगतो त्या जाहिराती मध्ये न तो कुत्रा नाही कुत्री आहे!… शपत्थ!! …..seriosuly शर्यत लावू शकतो मी … ‘wherever you go we follow !!’… “
“तुला काय वाटतं? ….कोलंबसला माहित नव्हतं कि तो भारतात नाही तर दुसरीकडे चालला आहे म्हणून? … नाही…!…. कोलंबस ला माहित होतं! … तो तर बिचारा बायको पासून दूर चालला होता .. नाहीतर दहा प्रश्न विचारत बसली असती .. ‘कुठे चालला आहेस ? कशाला चालला आहेस ? अच्छा!! ….तुला माहित पण नाही कुठे चालला आहेस? ….सरळ सरळ का नाही सांगत माझ्या पासून दूर चालला आहेस म्हणून!!’ …. अजूनही बिचाऱ्याचा मजाक उडवत सारं जग.!!”
…………………..
……………….
” …ऑफिस मध्ये काम करत असतो .. एस एम एस येऊन जाईल! … ‘I LOVE YOU!’ ….ठीक आहे…. मी पण एस एम एस करून देत असतो ‘I LOVE YOU TOO!! :) .. मग ह्याच्या नंतर, एस एम एस वर एस एम एस सुरु … अबे काम काय करते बे ऑफिस मध्ये!! …………… दोन एस एम एस चा रिप्लाय नको करू तर लगेच फोन येऊन जाईल …. फोन नको उचलू ….. तर दहा मिनिटात म्यासेज येऊन जाईल ‘i dont think its working nemore’…. दहा मिनिटात i luv u पासून I dont think its working nemore! … and dis is when u r not even down … आता समजलं कि ह्या माणसांना इतके हृदय विकाराचे झटके का बरं येतात आणि ते गे माणसं कसे काय यशस्वी असतात …!!…..कारण त्यांच्या आयुष्यात बाई नसते ना त्यांचं सुख हेरायला!! “
” .. लोकं म्हणतात ना कि behind every successfull man dere is a woman .. अगदी खरं!! …..पण लोक हे का नाही सांगत कि behind every unsucessman also dere is always a woman!!! ….आणि हे तर कुणीही सांगू शकता न कि अयशस्वी माणसांची संख्या कित्येत पटीने जास्त आहे यशस्वी माणसांपेक्षा ह्या जगात!! ..”
” साला ऑफिस मध्ये काम करत आहे .. सांगतोय कि उशीर होऊन जाईल बाई जेवण करून घे …तर जेवण नाही करणार .. उपाशी पोटी झोपून जाईल …. अरे मी सांगत आहे जेवून घे तरी त्रासाच!!!!! .. काय करू?? नोकरी सोडून देऊ मी???? …साला पहिले घरी जा……ह्यांना मनवा … ह्यांना खाऊ घाला ……ह्याच्या नंतर स्वतःची भूक तर तशीच मारून जाते …पण …हे सगळं होऊनही माणूस जर एखाद्या कोपऱ्यात जाऊन शांतीने बसला असेल ना तर…. ‘काहो? …काय विचार करत आहात ? काय विचार करत आहात ? काय विचार करत आहात???’अरे काही विचार नाही करत माझी माय हा विचार करत आहे कि तुझं तोंड कसं बंद करू !!!… काय विचार करत आहात!… क्यामेरा लावून देऊ डोक्यात माझ्या!!.. ह्याच्या नंतर ….‘आपल्याला बोलायला पाहिजे we need to talk.. i dont think its working nemore’ …”
“….मी तुला सांगतो आहे कि तू कधीच बायकांसोबत चर्चा करू शकत नाहीस ….कारण ह्यांच्या सोबत केलेली कुठलीही चर्चा ती चर्चा नसून वाद असतो! … आणि वादात तर बाबू तू ह्यांच्यासोबत जिंकूच नाही शकत!!… कारण आपल्यासारख्या माणसांची एक बेसिक गरज असते …..we need a sensible argument. आणि sense सारख्या फालतू गोष्टीसाठी त्या वाद हरून जातील??? छ्या!!! .. एक तर आजच्या गोष्टीवर वाद होणारच नाही … आजच्या गोष्टीवर भांडण होईल दोन महिन्या नंतर … तेव्हा आठवत पण नसतं साला झालं तरी काय होतं !! …. पण पोरी त्याला वाचवून ठेवतात .. .‘हे लहान शस्त्र नाही .. मोठ्ठा शस्त्र आहे .. ह्याला मोठ्ठ्या लढाईमध्ये वापरा‘ …… तू कधी try करून बघ, स्वतःला बरोबर prove करून ….. तुला वाटतच असेल कि ह्या मुद्द्य्वरून तू स्वताला बरोबर साबित करशील ……पण तेव्हाच एक आवाज येईल … ‘बोट दाखवू नकोस… खाली कर ते!!’… तुझं लक्ष पण नसेल पण तुझं एक भाबडं बोट त्यांच्या कडे point करत असेल … and suddenly the whole argument will flush into the gutter आणि मुद्दा हा राहील कि ‘तू बोट दाखवलाच कसं मला?’ .. कुणी? कुणी सांगितलं होता तुला?….. साला ह्याच वादात, त्या तुला जोडा फेकून मारतात ते काहीच नाही!! ….पण तू बोट दाखवलं तर सगळे मुद्दे खलास! …….तू चूक ती बरोबर!! ..”.
“लग्नाच्या आधी तो नागीण बिन का वाजवतात? .. हा का वाजवतात? अबे तो ब्यांड वाला पण चेतावणी देत असतो कि साल्या कोण येत आहे तुझ्या आयुष्यात! … अबे ह्यांची signature tune आहे ती !!….”
………………….
…………………….
“…………आता मला सांग ती काय सांगायला आली होती तुझ्या कडे?? ……… आणि हीच गोष्ट मी केली तर? …..हिच्या एखाद्या मैत्रिणीला कॉल करून माझे प्रोब्लेम्स सांगितले तर? .. ‘अच्छा!! माझ्या मैत्रिणीशी बोलायचं आहे!.. तिची सहानभूती पाहिजे तुला!… मग जाऊन राहत का नाहीस तिच्या बरोबर!!’….. “
………..
… होपलेस आहे यार…!!! “
………………………….
…………………….
पहिला मित्र -……”अबे….. हा तुझा जो प्रोब्लेम आहे ना….. तो मला पण आहे यार… !”
दोघंही एकमेकांकडे पाहत राहतात.

Thursday, May 26, 2011

गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात

भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं


मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं

Friday, January 21, 2011

कधी कोनावर प्रेम केले असेल तर वाचुन बघाच

तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता
.
"
गप रे" ति वैतगली होति
.
जरा सिरीयस बन. वर्षे झालीत
..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी
..
माझा हो कळव.. तो हसत म्हणाला
..अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि
.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम
,
एकमेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न
.
वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार
,म्हणजे घर, दुध, किराणा, मुल,लग्न म्हणजे पैसा..ति म्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला

पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल
..
अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली
..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे
.. प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे
.
तिन अल्टिमेटम दिला
..
1४ फेब्रुवारी चा दिवस होता आज खिशात पैसे होते
.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता
.
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास
,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली
.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच
.
ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति
.मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि
.
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति
..
तो आतुन तुटत चालला होता..प्लिज
..
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली
.मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...तो म्हणाला
.
ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे
?...
आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला
?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला
. आपण पुढच्या 1४ फेब्रुवारीला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल
..मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी.
त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन
...
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ति
..पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली
. .....
continue.....

ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली
.
1४ फेब्रुवारी तो तिचि वाज ल्या पासुनच वाट पहात होता
.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? तो अस्वस्थ होता

वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला
.
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली
.
कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते
.
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली
.
ति वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला
. अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.
अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल
.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला
.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली
..त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर.
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे
..
जा‌उ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली
.
मला पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता
...
तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला
. सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, बेडरुमच घर आहे... तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी
..
तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... वायाच गेल असत
.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि

. निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..

तो बराच वेळ बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.


टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,

सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे,
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,
ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता

कडु गोड आठवणीत तुझ्या साठव मला
मैत्रीचा हात हवा असल्यास आठव मला
माझ्या वाटेचा आनंद तुझ्याकडे ठेव
तुझ्याकडे काही दु:ख असतील तर पाठव मला.

Thursday, December 30, 2010

खुप विचार केला, पण Answer काही सापडेना |...

खुप विचार केला, पण Answer काही सापडेना |...
खुप विचार केला, पण
Answer काही सापडेना |
तुझ्या कडुन येणा-या
Miss Call च गुपित काही उघडेना ||
काम तुझं असुन ही,
Miss Call मला करतेस |
माझा फोन जो वर येइना,
Call वर Call करतेस ||

म्हणुनच मला Question पडलाय,
तु नेहमीच Miss Call का करतेस? |
Monthly मिळणा-या Talk Time च
Actually तु काय करतेस? ||
असं ही मला समजलंय,
तु सर्वांनाच Miss Call मारतेस |
कीतीही Urgent असलं तरी ही,
पैशाची बचत करतेस ||

असं ही नाही की,
तु खुप Poor आहेस
आणि Economically संकटात आहेस ||
म्हणुनच कधीतरी
Call ही करत जा ||
एवढे रुपये देऊन Mobile विकत घेतला,
त्याचा पुरेपुर Benefit घेत जा ||
Eagerly मैत्रीसाठी, प्रेमापोटी मी ही,
तुझ्या Miss Call ला Reply देतो |

Now आता असं होणार नाही,
Just एवढंच तुला सांगतो ||
तु समजदार आहेस,
या पुढे Call करशील |
Talk Time कडे न बघता,
माणुसकीला जपशील || 

म्या हिले म्हटल भूक लागलीव

म्या हिले म्हटल भूक लागलीव मले, खायले देन काही
मंगापसून चिपकली टीवीले , तुय मन भरलच नाही?
थ्या म्हटल, पयले कसोटी पायतो, मांग घर घर की कहानी,
अन घंट्यापासन मी उपाशीं.. त तुह्या जिवाच नाई पानी?
तवा अशी खवललि माह्यावर, म्हणे प्रेरनाची फारकती झाली
तिले एकच लेकरु व्हत व माय, त्याले दाबल व मातीच्या खाली
सारे पांढरया कपड्यात रडून राह्याले....माय आसवान भरली पायली
अथी माह्या जीवाची मासोयी झाली.....तुम्हाले भूक लागुन रायली??
थांबा जरासेकथ्या पर्वतिले दवाखान्यातून येऊ देते
थे श्रुति गावाहून आली का वांगे चिराले घेते
थे तुलसी जेलातुन आली हाये....तिच काय व्हते ते पाहू दया
सा महिन्यातून बाद नंदिनी होशात आली.. तिले जरास खाऊ दया
भाऊ आखरी १२ ले सोडला टीवी तिन, मी ता गेल्तो निजुन
मुट्ठीभर चनेच खाल्ले जे ठिवले होते भिजुन
राती येकले उठवल हिन्... म्हने झोपता कायले आता
उकडपेंडी केली दह्याची साजरी....माह्यासंग खाता?
रागच आला मले, म्हटल.....फाल्तुच्या सिरिअली पाह्यत
थ्या भिन्गरिवानी फ़िरवत तुले.....तूबी फिरत राह्यत
उद्या उपाशी मेलो म्हंजे...थ्या तुयसीवानीच गया काढजो
मंग साजरा सयंपाक करूनसन्या, मह्या फोटोले वाढजो!!! 

मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे !

मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे !

मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे !

खरखरत्या उन्ह्यात,घामांच्या धारात
सायकलची चाके ओढताना मी पाहिले आहे ||1||

ढगांच्या गडगडाटात,विजांच्या कडकडाटात
पथ्यरापरी अचल राहताना मी पाहिले आहे ||2||

कापरत्या थंडीत,गोरठलेल्या हातात
आईला सदेव साथ देताना मी पाहिले आहे ||3||

कर्जाच्या बोज्यात,आजराच्या विळख्यात
सदेव हसताना मी पाहिले आहे ||4||

पैश्याच्या कडकीत,सणासुदीच्या दिवशी
आईला शालू आणण्याची तगमग मी पाहिली आहे ||5||

फणफणत्या तापात कुड्कुडत्या सार्दित
सुर्याउन्हि कणखर आणि चंद्रउनही शीतल होताना मी पाहिले आहे ||6||

नाउमेदीच्या काळात,स्पर्ध्येच्या युगात
उंच उडण्यासाठी पंख देताना मी पाहिले आहे ||7||

कष्टाने कमवलेल्या पैश्यात,2BHK च्या दुनियेत
स्वप्नाउनही सुंदर असे घरकुल उभे करताना मी पाहिले आहे ||8||

आमच्या शिक्षणात,आईच्या आनंदात
गेली अडीच दशके राबताना मी पाहिले आहे ||9||

मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे !

Wednesday, December 29, 2010

अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे

अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.....

तिला म्हणालो,मला आजकाल झोप येत नाही
काय करु, तुझी आठवण मला झोपूच देत नाही
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स उघडली
झोपेची गोळी काढून,माझ्या हातावरती दिली.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो, माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे.
रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या प्रेमाचा रंग आहे.
ती म्हणाली,धीर धर अजुन थोडासाच उशीर आहे.
उद्या आमच्या रुग्नालयात मोफ़त रक्ततपासणी शिबीर आहे.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो, तुझ्यासाठी काहीही करु शकतो.
माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो.
त्याक्षणी ती उठली,आणि आत निघून गेली.
माघारी येताना हाती"डिसेक्शन बोक्स"घेवून आली.
..... मित्रांनो अशी ही, माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली.
तिने तिची ओढणी,माझ्या पायावरती बांधली.
नजरेस नजर मिळवून माझ्या,हळूच ती म्हणाली.
पडलास तू,पण जखम माझ्या काळजावरती झाली.
.......... तर माझी ही केस अशी आहे.
एक एम.बी.बी.एस. माझी प्रेयसी आहे.